charudutta aghor


एक नाचीझ के कुछ रु-ए-अलफाज........
"खुशनसीब बन्दे है हम उस खुदा की बंदगी के..,
कुछ लफ्ज़-ऐ-अल्फाज़ पेश है इस जालिम जिंदगी के......!!!!!"

Tuesday, October 16, 2012

"लक्षून शून्य"….!! © चारुदत्त अघोर.


ॐ साईं.
"लक्षून शून्य"….!! © चारुदत्त अघोर.
चैतन्य लुटले,
भाव लुटले;
एकाकी मी,
मन घावी तुटले;

होते गहिवरून मी,
थेंबी डोळे मिटले,
प्रेम करण्याचे आगळेच,
केले धाडस फिटले;

तोडून जग भीतीने,
भावनांस पिटले;
माझ्या सखीस लाडक्या,
प्रयत्नी मी जुटले;

एक आगळ्याच भावी,
बंध रेशीम गाठले,
मोहरून अंगी या,
प्रेमांग ताठले;

बेधुंद शब्दी काव्य,
बाणरुपी सुटले,
ओसंडते प्रेम झरे,
बांध सोडून तुटले,

पण...

पण त्या सुटल्या तीरी,
लक्ष्य ते हुकले,
हव्या हव्या प्रेमास त्या,
जीवन ते मुकले,

आता....

आता..नाही उरले काहीच अन्य,
एक नजर फक्त…..लक्षून शून्य….!!
चारुदत्त अघोर.(१/११/११)
 

2 comments: